माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत सरपंच किरण कोडापे यांची गटसंवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार!!
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत दामरंचा येथील सन 2021 पासून सरपंच पदावर सौ.किरण प्रमोद कोडापे यांची विराजमान आहे व त्या शासनाच्या नियमा प्रमाणे घरकुल धारकांना प्रमाणपत्र देण्यात येत होते परंतु काही लाभार्थीं सरपंच किरण प्रमोद कोडापे यांची विरोधक फसविण्यासाठी सरपंच पदाचा दुरुपयोगी व खोट्या स्वाक्षरी करून पंचायत समितीला घरकुल प्रमाणपत्र सादर करण्यात आले. तरी 2021 पासून आतापर्यंत दमरंचा कार्यालयात सादर करण्यात आलेले प्रमाणपत्राची चॉकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
18 सप्टेंबर 2023 दिनांक रोजी पंचायत समिती कार्यालयात सरपंच किरण कोडापे यांनी गेलो होते. त्या ठिकाणी दामरंचा ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्तींचे प्रमाणपत्र श्री.राकेश पनेला यांनी दमरांचा ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे यांची खोट्या स्वाक्षरीचे दस्तावेज प्रमाणपत्र आणून दिल्याचे सांगितले होते. त्या ठिकाणी दस्तावेज पडताळणी केले असता. त्यावर खोटी स्वाक्षरी करून दिल्याचे निदर्शनात आले होते. खोट्या स्वक्षरी केलेल्या राकेश पंनेला यांना योग्यती चौकशी करून फौंजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. अशी दमरांचा ग्रामपंचायतचे सरपंच सौ.किरण प्रमोद कोडापे यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत गठसंवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली.
यावेळी उपस्थिती माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रमोद कोडापे, प्रमोद गोडसेलवारसह ग्रामपंचायत सदस्यगण तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

