सर्व नागरिकांना आयुष्यात सुख – समृद्धी लाभू दे, सुरूशे कुटुंबीयांनी गणारायाला घातले साकडे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाइन वाशिम:- संपूर्ण राज्यात लाडक्या बाप्पाच्या घराघरात हर्ष उल्लासाने आगमन झाले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता आणि इंदिरा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सीमा सुरूशे यांच्या घरी श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू दे,अश्याप्रकरे श्री गणरायाला सुरूशे कुटुंबीयांनी यांनी साकडे घातले.
मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता आणि इंदिरा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सीमा सुरूशे यांच्या निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज घरात गणरायाचे आगमन होताच प्रतिष्ठपणा करून श्रीमती सीमा सुरूशे, प्रसाद सुरूशे, पूजा सुरूशे, आरती सुरुशे सह संपूर्ण सुरूशे कुटुंबीयांनी यांनी विधिवत पूजा, आरती केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

