संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका सायबर गुन्हेगारानें कन्फर्म रेल्वे तिकीट उपलब्ध करुन देण्याची बतावणी करुन प्रवाशांना जाळ्यात अडकवले. आयआरसीटीसीचा अधिकृत अँप वरून 13 लोकांच्या रेल्वे तिकीट काढल्या. त्यातील दोघांच्या तिकीट रद्द करुन पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. करण यादव वय 26 वर्ष रा. वानाडोंगरी असे अटॅकेतील आरोपीचें नाव आहे. त्याचाकडून मोबाईल आणि तिकिटाची रक्कम जप्त करण्यात आली.
कळमना येतील रहवाशी फिर्यादी विजय फुले यांना मुंबईला जायचे होते. 13 जन जाणार असल्याने त्यांनी आधीच तिकीट काढल्या. जाण्याचे तिकीट कन्फर्म होते. मात्र परतीच्या तिकीट कन्फर्म मिळत नसल्यानें ते तिकीट काढान्यासाठी नागपूर स्थानकवर आले. रेल्वेच्या तिकीट केंद्रात असताना आरोपी करण त्यांना भेटला. त्याने कन्फर्म तिकीट काढून देतो असे सांगितले, असे सांगून फिर्यादी ला जाळ्यात ओढले. करणंनें त्याच्याजवळील आयआरसीटीसी च्या कन्फर्म तिकीट अँपवरून 13 जणांची तिकीट काढल्या कन्फर्म तिकीट मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीनें ऑनलाईन 6 हजार 300 रुपये करणला दिले. स्क्रीन शॉट घेतल्यानंतर फिर्यादीनें तिकिटाची टीसी कडून खात्री करुन घेतली. घरी गेल्यावर पीएनआर नंबर तपासले असता तिकीट रद्द केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी ला अटक केली.

