Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह भक्तांच्या चिंता हरण करणारा थेऊरचा श्री चिंतामणीची महिमा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 21, 2023
in धर्म, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह भक्तांच्या चिंता हरण करणारा थेऊरचा श्री चिंतामणीची महिमा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अष्टविनायक विशेष लेख:- राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक घरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवमुळे लहान मोठ्या सह सर्वत्र आनंदाच वातावरणात निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात गणपतीची प्रसिद्ध अष्टविनायक ठिकाणे आहेत. या गणेशोत्सवात महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे आपण या सर्व अष्टविनायकांची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत अष्टविनायका तुझा महिमा कसा, महाराष्ट्र संदेश न्युज सह आज जाणून घेऊया अष्टविनायका मधील दुसरा गणपती सर्व भक्तांच्या चिंता हरण करणारा थेऊरचा श्री चिंतामणी महिमा.

सर्व चिंता हरणारा चिंतामणी गणपती, थेऊर
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. सर्व भाविक भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गणपती असल्याने त्याला चिंतामणी म्हणले जाते. येथील चिंतमणी गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची आहे. तसेच गणपतीच्या डोळ्यात माणिकरत्न आहेत. पुण्यातील पेशवे घराणे श्री गणेशाचे खूप मोठे भक्त होते. पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत दर्शनासाठी येत होते. माधवराव पेशवे यांनी थेऊरचा विस्तार केला, त्यांचे निधनही येथेच झाले. पुणे – सोलापूर महामार्गावरून काही अंतरावर थेऊर गाव असून ते पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.

थेऊरच्या चिंतामणी गणपतीची अख्यायिका..
एका अख्यायिकेनुसार कपिल मुनी यांच्याजवळ सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी रत्न होते. एकदा गणासूर त्यांच्या आश्रमात आला, तेव्हा त्यांनी त्याला या रत्नाचा वापर करून पंचपक्वान असलेले भोजन दिले. हे पाहून गणासूर आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनात मुनींजवळ असलेल्या रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिलमुनींकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली. परंतु मुनींनी ते रत्न देण्यास गणासूराला नकार दिला. परंतु गणासूराने बळाचा वापर करून ते रत्न त्यांच्याकडून हिसकावून घेतले. यानतंर रत्न परत मिळवण्यासाठी कपिलमुनी यांनी तपश्चर्या करून श्री विनायकाला आवाहन केले. मुनींची तपश्चर्या पाहून विनायक प्रसन्न झाले आणि त्यांनी थेऊर येथील कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध केला. कपिल मुनींनी परत मिळालेले चितामणी रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. तेव्हापासून येथे विनायकाला चिंतामणी म्हटले जाऊ लागले. तसेच या ठिकाणाला कदंबनगर म्हणून ओळखले जाऊ लागले.

श्री चिंतामणी गणपती यांनी मनोभावे प्रार्थना केली की सर्व भक्ताचा चिंता तो हरतो त्यामुळे दरवर्षी लाखो लोक या मंदिराला भेट देऊन पूजा करून श्री चिंतामणी गणपती याचा आशीर्वाद घेतात. चिंतामणी गणपती यांचं मंदिर खूप छान आहे. येथे गेलं की मन पफुल्लित होऊन चिंता मिटून जातात.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

अकोला जिल्हा रुग्णालय समोर खाजगी रुग्णवाहिकेला पार्कीग व्यवस्था द्या, भिमराजे रुग्णवाहिका संघटनेची मागणी.

Next Post

नागपूर येथे 3.17 कोटीची 84 हजार किलो सडलेली सुपारी जप्त, एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर येथे 3.17 कोटीची 84 हजार किलो सडलेली सुपारी जप्त, एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई.

नागपूर येथे 3.17 कोटीची 84 हजार किलो सडलेली सुपारी जप्त, एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In