Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: भिवंडी येथे 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 21, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: भिवंडी येथे 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील भिवंडी येथून एक संतापजनक घटना समोर आली होती. येथे एक नराधमाने 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे खून करण्यात आला त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकच खळबळ माजली होती. खून केल्यानंतर या नराधमाने तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून तो फरार झाला. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून नराधम आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिस पथकाने बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी वय 32 वर्ष या नराधमांस बेड्या ठोकल्या आहे.

पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदे आयोजित करून माहिती दिली की, नराधम आरोपी अन्सारी हा भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बिगारी काम करीत होता. मृत चिमुरडी चॉकलेट खाण्यासाठी सलामतकडे पैसे मागत होती. त्यावेळी त्याने तिला खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती माहिती ढवळे यांनी यावेळी दिली. शहरातील फेणेगाव परिसरातील चाळीतील सहा वर्षीय चिमुरडी 13 सप्टेंबरला हरवली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती न मिळाल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

रात्री उशिरा चिमुरडीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत असताना १५ सप्टेंबरला चिमुरडी राहत असलेल्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध घेतला. तेथील एका कुलूपबंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच खोलीमध्ये मिळालेल्या पुराव्याचे आधारे आरोपीचे नाव सलामत असे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बिहार राज्यात पळून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

वेशांतर करून पाळत ठेवत आरोपीला अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस आयुक्त महेश पाटील, भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, कोलते, पोलिस हवालदार खाडे, राणे, पोलिस शिपाई भांगरे, गावीत, हरणे, ताटे, सोनावणे, कदम, पराड, नंदीवले या पथकाने बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेवून संशयित सलामत अली आलम अन्सारी यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपीस स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने भिवंडीत आणून अटक करण्यात आल्याचे ढवळे यांनी सांगितले.

Previous Post

नागपूर येथे 3.17 कोटीची 84 हजार किलो सडलेली सुपारी जप्त, एफडीएच्या दक्षता विभागाची कारवाई.

Next Post

पुणे: देहुरोड गणपतीला आणण्याकरिता साडी नाही नेसू दिली म्हणून 13 वर्षीय मुलीची आत्महत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: देहुरोड गणपतीला आणण्याकरिता साडी नाही नेसू दिली म्हणून 13 वर्षीय मुलीची आत्महत्या.

पुणे: देहुरोड गणपतीला आणण्याकरिता साडी नाही नेसू दिली म्हणून 13 वर्षीय मुलीची आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In