राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:-तालूक्यातील (भं) तळोधी ते दरुर हा मुख्य मार्ग असून तो मार्ग सरळ गोंडपिपरी तालूक्याला लागून असलेल्या तेलंगणा सीमेवर आहे. त्यामुळे भं तळोधी येथून नीघताच भंगारपेट हे गाव पहीले पडतो तीथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांची रोज रहदारी व ते विश्रांती घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. पण येथे बसस्थानकच नसल्याने आम्ही थांबावे कुठं हा प्रश्न शालेय विद्यार्थी यांच्या पडत आहे.
गावात बसस्थानकच नसल्याने पाऊसाळ्यात प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. करीता भंगारपेट येथे लवकरात लवकर बसस्थानक मंजूर करा अन्यथा आंदोलन करू अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य सौ. अनीताताई काशीनाथ पोटे सह संपूर्ण गावकऱ्यानी केली आहे

