संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर : नागपुर पोलिसांनी प्रतिबंधीत खराब सुपारी विक्रेत्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील अनेक विक्रेत्यामध्ये धडक भरली आहे. या अगोदर नागपुर जिल्हात अन्न नागरी विभागाच्या वतीने विविध स्थिकाणी कारवाई करत कोट्यवधीची प्रतिबंधीत सडकी सुपारी जप्त केली होती.
नागपूर मध्ये लकडगंज क्षेत्रात स्मॉल फॅक्टरी क्षेत्रात 600 पोते सुपारी गोदामात सापडले. लकडगंज पोलिसांना गुप्त माहितीनुसार स्मॉल फॅक्टरी क्षेत्रात मारलेल्या छाप्यात 600 सुपारीचे पोते या कारवाई सापडले. ते चेक करतास चांगल्या सुपारी बरोबर खराब सडलेली सुपारी चे पोते सापडले. त्यानंतर पोलिसांनी एफडीआय विभागाला फोन करून व मोबाईलवर मेसेज करून बोलविले पण एफडीआयचे त्या क्षेत्रातील अधिकारी कारवाईच्या जागेवर व गोदाम वर पोहोचले नाही.
यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुपारीच्या गोदामात सापडलेले आसिफ, इम्रान, अमरीत यांनी सहित व काही व्यापाऱ्यांचा माल ठेवला होता. चांगला सुपारीच्या बरोबर खराब सडलेली सुपारीचे पोते पण त्यात ठेवले होते. ज्यावेळी पोलिसांनी छापा मारला. तेव्हा पोलिसाच्या टीमवर दबाव बनवण्यासाठी व्यापारी चे एक संघटन गोदाम वर आले. माहितीनुसार खराब सुपारी चा वापर खर्रा बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कॅन्सर पोटाचा आजार आतड्याचा आजार होतो. या कारवाईत एफडीआयच्या अधिकाऱ्यांच्या काही सपोर्ट नाही मिळाला. काही बोऱ्या खोल्या नंतर त्या बोऱ्यामध्ये सुपारी मिळाली. त्यानंतर लगडगंज क्षेत्रातील एफडीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी फोन केला व एफडीआयच्या अधिकाऱ्यांरी कारवाईच्या ठिकाणी नाही पोहोचले व पोलिसांनी एफडीआयच्या अधिकाऱ्यांना व्हाट्सअप मेसेज पण टाकला व एफडीआयचे अधिकाऱ्यांनी या कारवाईची काही दखल नाही घेतली.
लकडगंज च्या वरिष्ठ निरीक्षक अधिकारी अतुल सबमीस यांनी एक छापा मारला व छाप्या मध्ये 600 पोते सुपारी पकडली गेलीं आहे आणि ही सुपारी वेगवेगळ्या मालकांची आहे. असं माहितीत आढळलं. आता पोलिसांनी या सुपारी ची टेस्ट करायला पाठवाची आहे. ही सुपारी खराब आहे की चांगली याची याची शहा निशा करायला. हा माल पकडून लकडंगंज पोलिसांनी एफडीआयला हॅन्ड वर्क केले. पुढील तपास एफडीआय करतील.

