मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली व पोस्ट विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात प्रभारी अधिकारी दीपक सोनुने यांनी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविणाऱ्या योजनांची माहिती दीली तसेच पोस्ट विभागामार्फत भारतीय डाक मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पोस्ट विभागाचे श्रीनिवास बंडमवार यांनी दिली.
सदर मेळव्यात उप पोलीस स्टेशन पेरमिली चे व्हीएलई समय्या दुर्गम यांनी आभा कार्ड इ- श्रम कार्डची माहिती दिली व 17 नवीन आभा कार्ड काढून दिले. सदर कॅम्प दरम्यान 95 आधार कार्ड चे वाटप करण्यात आले. तसेच उप पोलीस स्टेशन पेरमिलीच्या स्वखर्चातून 20 नवीन पोस्ट बचत खाते तयार करून देण्यात आले
या कार्यक्रमाला पेरमिली पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनराज कोळी, पवन नायमणे, योगेश महाजन उपस्थित होते. पेरमिली हद्दीतील 10 गावातील नागरिकांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांसाठी पो. हवा रवींद्र बोढे, सुशांत गजबिये, प्रशांत मेश्राम, रमेश गावडे, दिलीप गावडे, डाक विभागाचे साक्षी सोनकांबडे, यश गुप्ता यांनी परिश्रम घेतले.

