महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तरप्रदेश :- राज्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे एका गर्भवती तरुणीचा तिच्याच नातेवाईकांनी मिळून पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ही तरुणी 70 टक्के जळली असून गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे एक 23 वर्षीय गर्भवती तरुणीला तिच्याच गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या संबंधातून ही तरुणी गर्भवती राहिली. ज्यावेळी ही माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. घरच्यांनी मुलीची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे कळाले. त्यानंतर कुटुंबाने तिला जबरदस्ती ने जंगलात नेल आणि तिच्यावर पेट्रोल टाळून तिला जिवंत जाळण्यात आले.
या तरुणीला तिच्याच जन्मदात्या आईने आणि भावाने मिळून या तरुणीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली. ज्यात ती 70 टक्के जाळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि गंभीररित्या जळलेल्या जखमी अवस्थेत या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. सध्या या तरुणीवर उपचार सुरू आहेत. परंतु मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आई आणि भावाला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी म्हटलं की, नवादा खुर्द येथील एका युवतीला तिच्या कुटुंबाने जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. या पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले. तिथून हायर सेंटरला डॉक्टरांनी नेण्याची शिफारस केली. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवला जाईल. स्थानिकांच्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. आई-भावाने मुलीला जिवंत जाळले. त्याआधी मुलीला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला आग लावली. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर गावकरी जंगलाच्या दिशेने धावत गेले तेव्हा हा प्रकार कळाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

