आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील किन्नगाव ते बोरगांव या गावची बस वेळेवर येत नसल्यामुळे शाळेतील मुला मुलीना शाळेच्या वेळेवर पोहचता येत नाही व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक या विद्यार्थांना विचारना करतात की तुम्ही शाळेच्या वेळेवर उपस्थित का राहत नाही. शाळेत वेळेवर हजर नाही राहल्यामुळे या सर्व विद्यार्थांच्या शिक्षणावर मोठा प्रमाणात होत आहे.
त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे त्यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थांनी आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, हिंगणघाट आगारातून सुटणारी बस ही सकाळी 9 वाजता व सायंकाळी 5.45 वाजता सोडावी जेने करून विध्यार्थी शाळेच्या वेळेवर पोहचनार, सायंकाळी सुटणारी बस ही खूप उशीरा सुटत असल्यामुळे विद्यार्थांना घरी पोहचायला खुप उशीर होतो त्यामुळे त्याचा अभ्यास सुध्दा होत नाही व गैरसोय होते. त्यामुळे बस वेळेवर सोडावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना मनिष कांबळे, गौतम सुटे, सुध्दाम ढाले, गणेश वानखेडे, विकास वानखेडे, जगदीश रडके, सौ. प्राजली सय्याम, गोविंदराव वानखेडे, वंसतराव चरडे, शंकर राव हागे सतिश रडके, शरद सुटे साहेबराव धोटे, किशोर माथनकर, दुर्योधन बाळबुदे, व किन्नगाव, गागांपूर, वाघोली, बोरगांव येथील सर्व शाळेकरी विध्यार्थी उपस्थित होते.

