युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन नागपूर:- येथे आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे तर प्रमुख अतिथी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष राजकुमार घुले, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सर्व सदस्य श्री मनोहर धनगरे, बाबा दुपारे, पुरुषोत्तम कुंभे, रामेश्वर दंडारे हे होते.
या कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलन सहाय्यक संचालक दक्षिण मध्य सांस्कृतिक विभाग नागपूर जी. आर बेटावर यांनी केले. माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष मनीषजी भिवगडे व अलंकार टेंभुर्णे यांनी केले त्यानंतर कलावंताचे सादरीकरण करण्यात आले जवळपास 220 मंडळांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले व उपस्थिताचे मनोरंजन व प्रबोधन केले. यात प्रामुख्याने खडीगंमत, दंडार, भारुड, गोंधळ, डहाका, कीर्तन सादर करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार न्यू दिल्ली व जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक व विदर्भ शाहीर कलाकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाहुण्यांचे आगमनानंतर शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी पाहुण्यांचे शाहिरी थाटात शाहिरी गायरातून स्वागत केले. याप्रसंगी मंचावर विराजमान शाहीर माणिक देशमुख, शाहीर मोरेश्वर मेश्राम, डॉक्टर रामनाथ पारधीकर, चुडामन लांजेवार, शाहीर हरिचंद्र कार्लेकर, शंकर रामटेके, वसंता कुंभरे, शाहीर संजय मेश्राम, विद्याताई लंगडे, मिलिंद खोब्रागडे, पुरुषोत्तम निघोट, शाहीर ज्ञानेश्वर तायवाडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष दयालजी कांबळे, गौरीशंकर गजभिये, उर्मिलाताई वाडी, उर्मिला तेलंगराव, तुळसाबाई देशमुख, शाहीर युवराजजी मेश्राम, शाहीर अशोक वाहने, शाहीर चंद्रभान टापरे, मारुती टेकाडे पांडुरंग डाखोळे, कीर्तनकार प्रभाताई निंबाळकर, शाहीर शंकर श्रीखंडे, इलेक्ट्रॉनिक मीडिया वार्ताहर संजय खांडेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सर्व कलावंतांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन अरुण वाहने सचिव चेतना मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

