मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- शासनाने घोषित केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून वर्धा येथे 7 कि.मी. अंतराच्या आत सेवाग्राम व सावंगी (मेघे) असे दोन वैद्यकीय महाविद्यालय आहे. हिंगणघाट व वर्धा शहराची लोकसंख्या तुलनात्मक दृष्ट्या सारखेच असुन हिंगणघाटमध्ये आजपर्यंत कोणतीही व्यवसायीक शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली नाही. हिंगणघाट शहर विदर्भातील सर्वांत जास्त लोकसंख्या व प्रमुख बाजारपेठ असलेले शहर असून कृषी उत्पन्न बाजारपेठेमुळे इतर जिल्ह्यातील ग्रामीण व शहराशी जोडलेली आहे. हिंगणघाट शहरातून देशातील सर्वात लांब उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग जात असुन महामार्गामुळे अपघात प्रवण झोन तयार झालेला आहे. अनेक रूग्णांना सेवाग्राम अथवा सावंगी (मेघे) जात असतांना तात्काळ उपचाराअभावी प्राण गमवावा लागलेला आहे.
हिंगणघाट तालुका नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या तीन जिल्ह्य़ांनी वेढलेला असुन बर्याच ग्रामीण भागाची बाजारपेठ हिंगणघाट असल्याने हिंगणघाट शहर मध्यवर्ती ठिकाण झालेले आहे. येथील रुग्णसंख्या बरीच मोठी असून सुरक्षित माता जननी उपक्रमात हिंगणघाटचा सतत दोन वेळा प्रथम क्रमांक आलेला आहे. माता रूग्णांची संस्था अधिक आहे.
भौगोलिक ञिमीतीन सर्वेक्षन केलेले लेफ्टनंट कर्नल लॅम्ब्टन यांची समाधी हिंगणघाट येथे आहे. शिवाय उपजिल्हा रुग्णालयात भरपूर जागा उपलब्ध असून गावाजवळ वना नदी वाहत असल्याने पाण्याची भरपूर व्यवस्था आहे.
हा सर्व बाबीचा विचार करता वर्धा जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटलाच झाले पाहिजे. अशी येथील नागरिकांची मागणी आहे. त्याकरिता हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती स्थापन केलेली असुन यासमितीत सर्व नागरिक, महिला सर्व स्वयंसेवी सामाजिक संघटना व सर्व राजकीय प्रक्षांचा समावेश आहे.
या समितीद्वारे सर्व स्तरावर प्रशासन व शासना पर्यंत निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा झाली. शांतता रॅली, हिंगणघाट बंद जनजागृती रॅली, एकदिवसीय धरणे आंदोलन, महिला कृती समितीद्वारे विविध आंदोलन व 125 दिवसापासुन सुरू असलेले धरणे आंदोलन लोकशाहीच्या संविधानीक पद्धतीने सुरू आहे.
दरम्यानच्या काळात पावसाळी अधिवेशनात आझाद मैदानावर दोन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हयात समितीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सहकार्यध्यक्ष जगदिश वांदिले, श्याम ईडपवार, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. राजुभाऊ तिमांडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, काँग्रेस किसान सेलचे प्रविण उपासे, राजेंद्र खुपसरे, सुरेंद्र बोरकर, श्रीराम येळणे, सुधाकर बंगाळे, हर्षल गुंडे, प्रा. प्रशांंत भेदुरकर, चारुदत्त काटकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रलय तेलंंग, आयुष राऊत, उमेश भोलरे, महेंद्र राऊत सहभागी झाले होते.
या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार भाष्कर जाधव, कॉंग्रेसचे वर्धा जिल्हाचे माजी पालकमंंञी सुनील केदार इत्यादीचा समावेश असुन सभागृहात हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्न उपस्थित केला. जयंत पाटील यांनी हिंगणघाटच्या मेडिकल कॉलेज प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न उपस्थित केला असता त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांनी वर्धा जिल्ह्यात मेडिकल काॅलेजची तीन ठिकाणावरुण मागनी आहे. योग्य स्थान निवडण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करून निर्णय घेऊ असे सांगितले.
उपसमिती गठित केल्यास जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटलेला असुन त्यांच्या कार्यवाहीबाबत कोणतीच माहिती समितीला अथवा प्रशासनाला नाही. त्यामुळे जनतेचा संयम सुटत आहे. आपली ही मागणी अधिक तीव्रपणे शासनदरबारी मांडण्याकरिता, तसेच शासनाने हिंगणघाटला मेडिकल कॉलेजची घोषणा करण्याकरिता आज दि. 3/10/2023 पासुन श्याम ईडपवार हिंगणघाट येथे उपविभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन लोकशाहीच्या संविधानीक मार्गाने सत्याग्रहाच्या स्वरूपात आहे. शासनाने हिंगणघाटला मेडिकल कॉलेजची घोषणा करूण त्वरीत हिंगणघाटच्या जनतेवर आजपर्यंत झालेला शैक्षणिक अन्याय दुर करावा अशी जनतेची मागणी आहे. या आंदोलनाला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
संघर्ष समीतीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सह कार्याध्यक्ष जगदिश वांदिले, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष पंढरीजी कापसे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु खुपसरे, तालुका प्रमुख सतिश धोबे, जिल्हा युवा सेना अध्यक्ष अभिनंदन मुनोत, अनिल भोंगाडे, सुरेंन्द्र बोरकर, अक्षय बेलेकर, सुरेंन्द्र टेंभुर्णे, राजु मुडे, अजय परबत, मोहम्मद इकबाल, पाशु मिर्झा, सौ. चंदा येलेकर, सौ.विद्या गिरी, सौ. सिमा तिवारी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

