उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुक्यातील मनपूर येथील शाळेत शिकत असलेल्या पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पुणे येथील स्वयंदीप सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वह्या, पेन चित्रकला साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
शिवाय येथील बुद्ध विहारात साप्ताहिक बाल धम्म संस्कार वर्ग येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, संत गाडगे महाराजांचे पुस्तक देण्यात आले.
यावेळी पुणे येथील स्वयंदीप सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रामाला लेखक धनराज डहाट यांच्या पुस्तकाच्या आधारित घेण्यात आलेल्या परीक्षांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नेहमी वेगवेगळी सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचा च एक भाग म्हणून हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348

