उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- समाजाच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तथागत ग्रुप कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संतोष खरात यांची नियुक्ती करण्यात आली. तथागत ग्रुपचे संस्थापक संदिपभाऊ गवई व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली.
तथागत ग्रुप कामगार विभाग प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झालेले संतोष खरात व प्रदेश संघटक विनोद नरवाडे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. याच माध्यमातून त्यांनी अनेकांची कल्याणकारी कामे केली. आपला असो की परका ते सर्वांच्याच मदतीला धाऊन जातात. सामाजिक कार्यासाठी म्हणूनच त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या सामाजिक कार्याला राजकारणाची जोड मिळाली ती त्यांच्या तथागत ग्रुपच्या मराठवाडा विभागाच्या अध्यक्ष पदावरील नियुक्तीमुळे या पदावर राहून संतोष खरात यांनी आजवर अनेकांचे हीत साधले. कित्येकांना त्यांनी न्याय मिळवून दिला.
तथागत ग्रुप संघटनेचे नेते मार्गदर्शक संस्थापक संदीपभाऊ गवई व संघटनेतील अन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात त्यांची वाटचाल आज यशस्वीरित्या सुरू आहे. दरम्यान तथागत कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संतोषभाऊ खरात व महाराष्ट्र प्रदेश संघटक विनोद नरवाडे यांचे त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले.

