Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर: फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत, आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 2, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत, आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आम आदमी पक्षाचा महानगर पालिका परिसरात ठिय्या आंदोलन

निखिल पिदुरकर, कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिके परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.

मागील २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, ४ वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात २०० बॅनर लावले. त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली. शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना विजेचा जोरदार झटका बसला. करंट लागल्यागत अवस्था झालेल्या आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला. या बॅनरला महानगरपालिकेने काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला. मनपात जाऊन ठीय्या आंदोलन केले. व काढलेले बॅनर लावायची मागणी लाऊन धरली.

आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. आमदारांनी केवळ भूलथापा दिल्या आहेत. नागरिकांमध्ये या घोषणेमुळे मोठी नाराजी पसरली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आमदाराच्या दबावात परवानगी घेतली असतानाही महानगर पालिकेने आमचे बॅनर काढून टाकले. आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे महानगर पालिकेत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीसाना पाचारण करण्यात आले.

महानगरपालिकेचे अधिकारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत होते. या चर्चेअंती महानगरपालिकेने परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच दिलेली परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याची नामुष्की मनपावर आली आहे. यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, संगठन मंत्री भिवराज सोनी, जिला सचिव संतोष दोरखंडे, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री, संतोष बोपचे,युवा अध्यक्ष प्रशांत सिदुरकर, शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, ऍड तब्बसूम शेख, दिपक बेरशेट्टीवार, शंकर सरदार,पवनकुमार प्रसाद, महेश नन्नावरे, अश्रफ सय्यद, गणेश आडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मराठा असो की ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण समर्थक असो त्यांनीं ‘सत्यासाठी आग्रह करावा पण अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा: राजेंद्र वनारसे

Next Post

राज्य स्तरीय शालेय कराटे वुशू स्पर्धेत मॉडेल स्कुल अहेरीच्या विद्याथ्यांने गोल्ड मेडल जिकंले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्य स्तरीय शालेय कराटे वुशू स्पर्धेत मॉडेल स्कुल अहेरीच्या विद्याथ्यांने गोल्ड मेडल जिकंले.

राज्य स्तरीय शालेय कराटे वुशू स्पर्धेत मॉडेल स्कुल अहेरीच्या विद्याथ्यांने गोल्ड मेडल जिकंले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In