अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन अकोला:- सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या इतर वैद्यकीय तपासणी करीता जसे की, ईसीजी, सिटिस्कॅन, एम.आर.आय., 2 डी इको, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, मूत्रविज्ञान न्यूरोसर्जरी व इतर आवश्यक असलेल्या तपासणी करीता शासकीय सर्वोपचार रुग्णालयातुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवले जाते.
बाहेर गावातील आलेल्या गोरगरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पायी किंवा ऑटो द्वारा जाणे येणे करावे लागते. याचा गोरगरीब रुग्णांना नाहक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असलेली एक रुग्णवाहिका या रुग्णांना तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालयातुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ने – आण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन छेडु अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ता सुमित भाऊ तेलगोटे, सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, साप्ताहिक खबर दुनिया की चे संपादक समिर खान, पत्रकार सईद खान उपस्थित होते.

