रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरातील शेगाव पंढरपूर महामार्ग रेल्वे स्टेशन जवळ चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक करण्यासाठी परतूर शहरातील शेगाव पंढरपूर महामार्गावरील रेल्वे स्टेशन जवळील मध्यभागी जागेवर सविधान उद्देशिकेची प्रतिकृती निर्माण करून त्या जागेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असे नाव द्यावे कारण तीस वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची ही वादग्रस्त जागा होती त्यामुळे या ठिकाणास डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक असेच नाव देण्यात यावे
राज्याचे मुख्यमंत्री याच महामार्गावर हिरालाल नगर येथे अग्रसेन महाराज यांच्या स्मरणार्थ शासकीय निधी देऊन अग्रसेन चौक निर्माण केला. अगदी त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक निर्माण करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी परतुर शहराच्या वतीने व शहरातील सर्व संविधान प्रेमीकडून करण्यात येत आहे.
तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणाऱ्या 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिनी या संविधान चौकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडी परतुरच्या वतीने करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर वंचित बहुजन आघाडी परतुर यांच्या वतीने गंभीर इशारा देण्यात आला.
यावेळी रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष जालना, रवींद्र भदर्गे तालुकाध्यक्ष परतुर, दीपक वक्ते, प्रकाश मस्के, महादेव पैठणे, आकाश वाघमारे, हनुमंत मोरे, दीपक हिवाळे, प्रदीप साळवे, लिंबाजी कदम, अशोक ठोके, संजय गायकवाड, विकास उमप, रवी इंगळे, प्रशांत वाकळे, राहुल पहाडे, कृष्णा पाईकराव, मनोज वंजारे, रमेश कदम, नितीन खरात, विकास आवरे, सुयोग दवंडे यांची उपस्थिती होती.

