हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 07 नोव्हेंबर 2023 रोजी विद्यार्थी व बालक दिवस तसेच दिवाळीच्या शुभेच्छा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक होते, प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम, श्री. यु. के. रांगणकर होते.
प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी दिवसानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बालक दिवसा निमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम, श्री. यु. के. रांगणकर विद्यार्थी व बालक दिवसाचे महत्व समजावून सांगून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषण श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम व आभार श्री. एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात श्री. चंदावार बाबू, श्री. जगदीश कांबळे, श्री. वामनभाऊ बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थीगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला बुक आणि लाडू वाटप करण्यात आले.

