युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- कळमेश्वर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळी खुर्द शिवारात रत्नप्रभा अरविंद कुकडे व पेठे यांच्या शेता जवळ दिनांक 7 नोव्हेंबरला अचानक सावळी खुर्द येथील शेतकरी संदीप सावरकर हे शेतकरी शेतात जात असताना दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पडलेला अवस्थेत बिबट्या वाघ आढळून आला त्यांनी सावळी खुर्द येथील माजी सरपंच मंगेश चौरे यांना माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी कळमेश्वर येथील वन विभागाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली तसेच त्यांनी तालुक्यातील तहसीलदार यांनाही माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच त्यानंतर लगेच वनविभागाचे टीम सावळी खुर्द येथे दाखल होऊन वाघाची पाहणी केली त्यात हा बिबट वाघ कसा काय मरण पावला याबद्दल त्यांनी शहानिशा करण्यात आली हा वाघ दोन दिवसापूर्वी मरण पावल्याचे लक्षात आले व त्यानंतर त्यांनी पंचनामा करून त्या बिबट्याला पोस्टमार्टम करण्याकरिता पाठवण्यात आले.
येथील वनविभागाच्या टीमला पत्रकार युवराज मेश्राम यांना विचारणा करण्यात आली असता कशाप्रकारे वाघ मरण पावला काय झाले या संदर्भात पत्रकारांनी जाब विचारला असता वनविभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यानंतर पत्रकारांनी त्यांना जबरदस्तीने जबाब विचारण्यात आला असता येथील वनविभाग अधिकारी पी आर शिरपूरकर यांनी थोडक्यात माहिती दिली हा वाघ येथे दोन दिवसापूर्वी कशाप्रकारे मरण पावला याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने शंका कुशंका निर्माण करण्यात येत आहे.
वाघांचा मृत्यू नेमका कसा काय झाला याला कुणी काही चारले का कुणी काही मारले का त्याबद्दल दोन ते दिवसात पंचनामा करून आपल्याला पोस्टमार्टम चा रिपोर्ट देण्यात येईल अशी माहिती वनविभागाचे अधिकारी पीआर शिरपूरकर यांनी दिली. या वेळी सहाय्यक वनरक्षक आर् एन घाटोळे राऊंड ऑफिसर खेडकर वनरक्षक गोविंदा मेंढे डॉक्टर सोनकर गावचे सावळी खुर्द येथील माजी सरपंच मंगेश थोरे माजी पोलीस पाटील राजेंद्र बागडे पोलीस पाटील निकेश बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

