मेडिकल बेड, एअर बेड व वॉकर मुळे गरीब रुग्णांना मिळाला दिलासा.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट या सेवाभावी संस्थेच्या वतीने संविधान दिन व गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून दिनदयालजी उपाध्याय अंत्योदय योजने अंतर्गत चालणाऱ्या शहरी बेघर निवारा, हिंगणघाट येथे आजारी वृद्ध व्यक्तींकरिता मेडिकल बेड, एअर बेड, वॉकर आदी साहित्यांची भेट दिली.
हिंगणघाट येथे राहणाऱ्या लाभार्थी ९३ सोनाबाई नवघरे याची प्रकृती अत्यंत नाजूक असून यांच्या करिता मेडिकल बेड व एअर गादी उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला. तसेच पायांचा त्रास असणाऱ्या वृद्धांना वृद्धांना वॉकरची भेट देण्यात आली. याबद्दल येथील कार्यरत संस्था अध्यक्ष जीवनज्योती महिला ग्रामीण विकास संस्थाच्या संचालिका वैशाली पालांडे यांनी मित्र परिवाराचे यावेळी आभार मानले. नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी निराधार वृध्द व वंचितांच्या सेवेकरीता मित्र परिवार कटिबध्द असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला पी. व्ही टेक्स्टाईल जामचे अशोक आकरे, पारस मुनोत, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य, सचिव पराग मुडे, अरुण पंडित, लक्ष्मण डहाके, दामोदर चंदनखेडे, महेश खडसे, बाबाराव धाईत, महेश दीक्षित, अतुल पलांडे, दिनेश वर्मा, रूपचंद हेमनानी, भैय्या निखाडे, शेषराव महाबुधे तसेच बेघर निवारा येथील कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

