रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- सरकार मधील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी साठी वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर एकरी भाषेत टीका करून त्यांनी दिलेली माहीती खोटी आहे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आंबेडकरी सामाजाच्या व वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यामूळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
परतूर तालुक्याच्या वतीने त्यांचा आम्ही जाहिर निषेध करीत आहोत साहेबांनी केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मंत्री पदावरून हकालपट्टी करून अ़ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर टीका केल्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा करावा अशी मागणी करीत आहोत. नसता वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष शोएब भाई पठाण ता.उपाध्यक्ष. ॲड. सुरेश काळे, राहुल नाटकर शहर अध्यक्ष, सचिन सोनपसारे, मनोज वंजारे, गौतम लहाने, हरिभाऊ आखाडे, बाळू कदम सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

