निखिल पिदुरकर, कोरपना तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- राजेंद्र विद्यालय भोयगांव ता. कोरपना जी. चंद्रपूर येथिल विद्यार्थिंनी कु. मानसी राजेंद्र वरारकर हिने गडचांदूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे सन २०२३: २०२४ करीता दिनांक १/१२/२०२३ ते दिनांक ३/१२/२०२३ या कालावधीत आयोजित तालूका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रश्न मंजुषा विभागात तालूक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
इरई या छोट्याशा खेड्यात शेतकरी असलेल्या कुटुंबातील असलेली मानसी ही अभ्यासू विद्यार्थांनी असून तिला शिकवणी वर्ग किंवा इतर कोणाकडूनही मार्गदर्शन नसतांना तिने स्वतः च्या मेहनतीने तालूक्यातून प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. सतत दोन वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने ती माॅडेल तयार करून विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभागी होत आहे.

