उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला 5 डिसेंबर:- वृद्ध कलावंत, साहित्यिक यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक नागदेवे, या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी केले. कलावंताच्या विविध प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत कलावंतांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून, कलावंतांचे असणारे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविण्यात येतील असे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी फोन द्वारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री यांना अवगत करून दिले. येत्या 20 डिसेंबर पर्यंत योग्य न्याय न मिळल्यास, पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या धरणे आंदोलनाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण जे पी सावंग, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण गोपनारायण, महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा अर्चना धांडे, जिल्हा सचिव ऍड. कुलदीप इंगळे, डी.जे. वानखडे, आनंदा इंगळे, शाहीर मधुकर नावकार, शाहीर खंडुजी सिरसाट, जे.पी.मोरे यांनी मार्गदर्शन केले.
या धरणे आंदोलनात जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष जगदेव हिवराळे, देविदास डोंगरे, अनील वाकोडे, शे.साबीर, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष अजय प्रभे, तालुका महासचीव समाधान वानखडे, तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात, अजय बोदडे, अकोला तालुका अध्यक्ष बाळासाहेब दामोदर, बाळापूर तालुका अध्यक्ष विलास अवचार, तालुका महासचीव किशोर नीलकंठ, बाळापूर युवक आघडी तालुका अध्यक्ष मिलिंद सुर्वे, अकोट तालुका अध्यक्ष अविनाश राय, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष जुगल किशोर पातूर तालुका अध्यक्ष पंडित सदार, देविदास डोंगरे, महिला आघाडी महासचिव सरितादेवी मनवर, कमलकिशोर भरतीया, डी. जे.वानखडे, मिलिंद बनसोड, संजय इंगळे, शाहीर मधुकर नावकार, गणेश इंगळे, शेषरावं इंगळे, मोहन जामणिक, रवींद्र गवई, सागर गोपनारायण,राहुल शिरसात, नरेंद्र देशमुख, अर्जुनराव घुगे, राहुल वाहुरावघ, सुनील वाहुरावघ, अमोल वाहूरवाघ, रवींद्र वाहूरवाघ, किसन वाहूरवाघ, अभिमन्यू ऑइंबे, पांडुरंग इंगळे, भाऊरावं इंगळे, संदेश तायडे, सिद्धदार्थ वाहूरवाघ, पंजाबरावं राऊत, राजकुमार गुल्हाने, जी.आर. मोरे, सागर गोपनारायण, देवानंद अंभोरे, विश्वास सिरसाट, एस.एस.हातोले, गजानन धोत्रे, भिकाजीं महादे, समाधान पाटील, बाळू गावंडे, साहेबराव रेवाळ, सोनवणे सोनोने, अनिल शामस्कार, अर्जुन गवई, राजूभाऊ चोंडकर, शेषराव तेलगोटे, प्रकाश इंगळे, श्रीकृष्ण केदार, संजय तायडे, रघुनाथ सिरसाट, प्रीतम आकोडे, सुदामा भगत, भीमराव तायडे, राजाराम सरदार, माणिक अरखराव, मंदाबाई चंद्रकार, मंगला वानखडे, बेबी राठोड, शारदा पागृत, दुर्गा चारापुरे, प्रमिला चंदन, शोभा काकड, सरस्वती फुकट, लिलाबाई अर्धळे, बेबीबाई अर्धळे, आशा पोते, ज्योती चंदन, ताराबाई मदनकार, सुरेखा लहारिया, निर्मला मानकर, दिक्षा रायबोले, कोकिळा गवई, रेखा जाधव, सविता वानखडे, वनमाला वाहुरवाघ, शालु नाईक, मंदा उपरवट, शिला सरदार, प्रज्ञा शेगावकार यांच्या सह बहुसंख्य कलावंत उपस्थित होते.

