प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर ग्राम पंचायतच्या वतीने आज 6 डिसेंबर रोज बुधवारला सकाळी 9.30 वाजता ग्राम पंचायत कार्यालय वडनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली व आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच महामानवाचा जयघोष करण्यात आला.
वडनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून सर्व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आबेडकरांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. महापरीनिर्वाण दिवसाला उपस्थीत मान्यवर सौ. कविताताई विनोदराव वानखेडे (सरपंच) , सुभाष क.शिंदे (उपसरपंच) सौ. रीनाताई ग. तागडे (ग्रा.पं.सदस्या), विनोद या. वानखेडे (माजी सरपंच) सौ. वर्षाताई सं. भोयर ( ग्रा.पं.सदस्या), सौ. नम्रताताई म. भगत (ग्रा.पं.सदस्या), सौ. वनिताताई सु. कळसकर (ग्रा.पं.सदस्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा समिती पदाधिकारी सुरेश भगत, गजानन जारोंडे, सुनील मुन, मोहन लोहकरे, चंद्रशेखर ब्राम्हणे, प्रदीप माणिकपुरे, दिगांबर भगत, चोखोबा कुभारे, सोपान कांबळे , घनश्याम भगत, वैभव फुलझेले, गुणवंत कुंभारे , निखिलभाऊ कळसकर, छायाबाई कुंभारे, फुलझेले ताई, उमरेताई, कळसकरताई, सुनिलराव कळसकर, संजय भोयर तसेच बिरसामुंडा आदिवासी सेवा समितीचे पदाधिकारी सुनील मेश्राम, गणेशराव सीडाम, विजय कोरवाते, लक्ष्मणराव कन्नाके उत्तम कुमरे, अभय मडावी, तसेच मोठ्यासंखेने महिला व पुरुष उपस्थित होते.

