डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजाला प्रेरणादायी शिकवण देते: डॉ. विजय धाबर्डे, नागपुर
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आजही स्वातंत्र्य भारतात जाती – जातीत, धर्मा – धर्मात, माणसां – माणसात भेदाभेदा बघावयास मिळतो, पण संविधानात्मक दृष्टिगत तो पाळता येत नाही याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते कारण डॉ. आंबेडकर यांना जन्मापासून आपल्या जीवनात आलेल्या अडचणी यावर मात करीत सर्वे धर्म, पंथ, पक्ष, जाती-पाती, स्त्री-पुरुष यासह शोषित पिडितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व अधिकारासह मानवी हक्काची जाणीव करुन देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कृतिशील विचारधारा समाजाला घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते, असे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक डॉ. विजय धाबर्डे यांनी व्यक्त केले.
भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, राष्ट्रीय युवा प्रेरणा दिन म्हणून मानला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन ज्युपिटर अकादमी नंदोरी चौक येथील सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव तथा संस्कार परीषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर हे होते तर प्रमुख अतिथि राजेश मुन, भा.यु.सं. परीषदेचे संयोजक अमोल भोमले आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर, भारतमाता, स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन बुध्दवंदना तथा मौन श्रध्दांजली देवून बाबा तुझ्या जाण्याचे दु:ख झाले ऐवढे.. दलित, शोषितांचा वाली संविधान देऊन गेला हे गीत कु.अर्चना बाळबुधे, कु.नेव्ही पिसे, नंदिनी आखाडे, यांनी सादर केले. तर कु.लुंबिनी अंबादे, अर्चना पिसे, नैतिक लांजेवार ह्या विद्यार्थांनी राष्ट्रीय युवा प्रेरणा दिनाचे महत्व व धम्म यावर आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि राजेश मुन यांचे सुरेल आवाजात “बाभीमा घे ही वंदना, लाखो दलितांचा तु आधार गेला” हे भावगीत सादर केले. तर अध्यक्षीय उद्बोधन करतांना प्रदीपकुमार नागपुरकर म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देहरुपी शरीर जरी महानिर्वाणी झाले असले तरी देशाला संविधानात्मक चालविण्यासाठी जो ग्रंथ भारत देशाला बहाल केला तो आजच्याचं नव्हे तर युगा-युगाच्या पिढीला प्रेरणादायी ठरतो, यासाठीचं भारतीय युवा संस्कार परीषद हा दिन राष्ट्रीय युवा प्रेरणा दिन म्हणून मागील २७ वर्षापासून मानत असते. तेव्हां विद्यार्थांनी व युवकांनी ती प्रेरणास्रोत घेऊन आपणही वंचित, दलित, शोषित, पिढीत मानवांच्या उत्थानासाठी कार्य करीत रहावे असे मत नागपुरकर यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन काळे तर सुत्रसंचालन परिषदेचे संयोजक अमोल भोमले तर आभार प्रदर्शन यश नाईक यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.निकिता भोमले, कु. प्रिया भोमले, कु. वैष्णवी काळे, चि.आज गिरी, तन्मय डंभारे, सुरज फुलझेले, तेजस ढोकपांडे आदीने परीश्रम घेतले.

