नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी मो. नं 7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वणी:- महेश कोसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त व स्वर्गवासी सुधारक कोसरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज वणी येथील अपंग शाळेला भेट स्वरूपात टी शर्ट व खाण्याचे अल्पोहार देण्यात आला.
आज १५ डिसेंबर या दिवशी महेश कोसरकर यांचा जन्म दिवस यांचे औचित्य साधून त्यांनी अपंग शाळेला भेट वस्तू दिल्या, त्यावेळी त्यांच्या आई रुपलता सुधाकर कोसारकर व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक रुंद उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकवृदानी रूपलता सुधाकर कोसारकर, महेश सुधाकर कोसारकर यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

