हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक 22 डिसेंबर रोजी जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता पालक शिक्षक सभा घेण्यात आली. प्रथमता: भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या फोटोला मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. भगत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, सौ. सारिका शेंडे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, यु. के. रांगणकर विज्ञान शिक्षक यांची मंचावर उपस्थिती होती.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.
पालक शिक्षक सभेत 1) मागील सभेचे अहवाल वाचन करणे, 2) सत्र: 2023- 24 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करणे, 3) सभाध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयात, सभेत सौ. रंजना शर्मा, सौ. वर्षा ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांचे निराकरण सभाध्यक्ष यांनी केले.

यावेळी रांगणकर सर यांनी भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनपटावर माहिती विशद केली. एम. डी. टोंगे सर यांनी विषयांमध्ये गुणांची कवरींग कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. आपले अध्यक्षीय भाषण करताना भगत सर मुख्याध्यापक यांनी सांगितले की, आपला पाल्य घडला पाहिजे याकडे पालकांनी जागरूक राहून लक्ष दिले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन आर. बी. अलाम, आभार एस. एन. लोधे मॅडम यांनी केले. पालक शिक्षक सभेत शिक्षक चव्हाण सर, शिक्षकेतर कर्मचारी जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, वामनराव बोबडे, इंद्रभान अडबाले पालक वर्गातून राकेश टेंबरे, मायाबाई कस्तुरे, लता साठे, रंजना शर्मा, वर्षा ठाकरे, शुभांगी दुर्गे, शमशाद पठाण तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

