राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- शेणगाव येथे ३० डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती,शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष,तालुका जिवती च्या वतीने स्थानिक बस टाॅप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते,माजी आमदार ॲड.वामनराव चटप, देशौन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, आणि सहकारी यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेणगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार, स्वतंत्र भारत पक्षाचे देवीदास वारे, नरसिंग हामणे उपसरपंच, रामेश्वर नामपल्ले, भिमराव आत्राम सरपंच, उध्दव गोतावळे, लहु भुते, प्रकाश शिंदे, शेषराव खंदारे, न्यानेश्वर वारे, बालाजी नरोटे, अशोक तांबरे, अंकुश देवकते, शिवाजी माने, शादुल सय्यद, अबुतुराब जागीरदार, तुकाराम सिडाम, अंगत तांबोळे, मारोती रंभाजी, गजानन वारे, न्यानु खंदारे, फिरोज पठाण, बेलाळे मामा, संजय रावनकोळे, माधव वारे, श्रिराम सानप, यांच्यासह शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या आंदोलना दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप यांच्या पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

