राहुल घोष व मनिष ढाली संघ पहिले विजेतेपद पटकावले
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील बॅडमिंटन खेळण्यात आलेले तालुक्यातील 32 संघांनी सहभाग घेतला तर अंतिम दुहेरी सामन्यात राहुल घोष व मनीष ढाली संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद अमित सोनी व प्रशांत कुलयेटी ह्यांना मिळाले. तसेच पुरुष (सिंगल) सामन्यात राहुल घोष याने विजेतेपद पटकावले व प्रशांत कुळयेटी ह्यांना उपविजेतेपद पटकावले. सदर स्पर्धेचे आयोजन मनीष ढाली व लॉयड्स मेटलस लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिटी फॉउंडेशन ह्यांनी केले.
लॉईड स्टील मेटल्स यांच्या वतीने पुरुष (सिंगल )व पुरुष (डब्ब्ल) प्रथम बक्षीस म्हणून १० हजार, ८ हजार, ६ हजार असे अनुक्रमे पारितोषिक देण्यात आले. ह्या स्पर्धेत प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप सर, राजा सर, राज विलन सर, पिएसआय शुभम म्हेत्रे, मेजर मुंडे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे, पापा पुण्यमुर्तीवार, प्रसाद नामेवार, बंटी आसुटकर आदी उपस्थित होते.
ह्या स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रा. राहुल ढबाले ह्यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष ढाली, राहुल घोष, प्रशांत कुळयेटी, अमित सोनी, अनुप सरकार, बादल सोनी, प्रेम मजुमदार, प्रीतम दत्ता, जोजो बेपारी ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

