देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, नागपूर.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दिनांक 01जानेवारी 2024 ला श्रावस्ती बुद्ध विहार राजीव नगर या ठिकाणी भीमकोरेगाव च्या महार शुर वीरांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. त्या नंतर गरजू विद्यार्थ्यांना जयताळा,खामला, जिल्हा परिषद हायस्कूल रायपूर (हिंगणा) इत्यादी शाळांमध्ये जाऊन शालेय साहित्यचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती बुद्ध विहार (समिती) राजीव नगर व समता सैनिक दल (शाखा) राजीव नगर हिंगणा रोड नागपुर यांनी केले केले होते.

