भाकपा एटापल्ली यांनी दिल्लीला जाऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग आणि पी. संदोष कुमार खासदार यांना दमकोंडवाही बचाओ तोडगट्टा खाणविरोधी निषेधाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली, दि.08 जाने:- जिल्हातील एटापल्लीने खदान विरोधी आंदोलन दामकोंडवाही बचाओ तोडगट्टा चा आंदोलकांना झालेली अटक व दाखल गुन्हाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्य वतीने दिल्लीला जाऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग आणि पी. संदोष कुमार खासदार यांना ला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील दामकोंडवाही पहाडीचा काठावरील तोडगट्टा गावात खदान विरोधी आंदोलन सुरू होते. या आंदोलनात महिला, पुरुष, तरुण, वृद्ध असे सर्वच घटक सहभागी होते. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना बेकायदेशीरपणे अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. असा अटक झालेल्या आंदोलकांचे म्हणणे आहे. याची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आम्ही भाकपा या निवेदनात आम्ही मागणी करतो की, आंदोलकांना झालेली अटक आणि दाखल गुन्हा यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच, आंदोलकांवर जर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा. या प्रकरणाचा चौकशी होऊन अहवाल प्रसिद्ध व्हावे. भाकपा कॉ. सचिन मोतकुरवार ता. सचिव भाकपा एटापल्ली

