Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई विद्यापीठात नवा गोंधळ; LLB कायद्याच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा संताप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 20, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई विद्यापीठात नवा गोंधळ; LLB कायद्याच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांचा संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या परीक्षेत नवा गोंधळ समोर आला आहे. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत विद्यापीठाने जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला.

मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या ‘लेबर लॉ अँड इंडस्ट्रीअल रिलेशन – भाग एक’ या विषयाची परीक्षा बुधवारी होती. या विषयाचा अभ्यासक्रम बदलला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली होती. परीक्षेत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या हाती जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पडली. त्यातून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ‘नवीन अभ्यासक्रमानुसार विषय शिकविण्यात आला होता. त्यानुसार परीक्षेची तयारी केली होती. मात्र, प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न जुन्या अभ्यासक्रमानुसार असल्याचे दिसले. त्यामुळे वर्गातील सर्वांचाच गोंधळ उडाला. विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका बदलून मिळेल या आशेवर ५ वाजेपर्यंत वर्गात बसून होतो. मात्र, कोणतेच उत्तर मिळाले नाही. नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे लिहू शकलो. विद्यापीठाने नव्याने परीक्षा न घेतल्यास वर्गातील सर्वच विद्यार्थी नापास होतील’, अशी माहिती ठाण्यातील टीएमसी लॉ कॉलेजचा विद्यार्थी संदीप वंजारी याने दिली.

दरम्यान, प्रश्नपत्रिकेत जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न आल्याचे समजताच त्याची कल्पना विद्यापीठाला दिली. मात्र दोन्ही अभ्यासक्रमांत काही भाग सारखा आहे. त्यामुळे काही प्रश्न नवीन अभ्यासक्रमाशी संदर्भात असल्याने विद्यार्थ्यांनी त्याची उत्तरे सोडविली. मात्र अनेक प्रश्न अभ्यासक्रमाशी संबंधित नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला, अशी माहिती एका कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली.

विद्यापीठाने जुन्या ६०/४० पॅटर्नच्या अभ्यास क्रमानुसार प्रश्नपत्रिका काढली होती. मात्र, आता ७५/२५च्या पॅटर्ननुसार अभ्यासक्रम लागू आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेणे दुर्दैवी आहे. जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका काढणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यास विद्यापीठाने सुधारित अभ्यासक्रमानुसार पुन्हा परीक्षा घ्यावी’, अशी मागणी युवा सेना उपसचिव अॅड. सचिन पवार यांनी केली.

शहानिशा करून निर्णय घेणार: ‘प्रथम वर्ष विधी सत्र १ या परीक्षेतील ‘लेबर लॉ अँड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेऐवजी जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल’, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Tags: LLB परीक्षामुंबई
Previous Post

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.

Next Post

अहेरी तालुक्यातील टेकुलगुड्डा येथे बाल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी तालुक्यातील टेकुलगुड्डा येथे बाल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

अहेरी तालुक्यातील टेकुलगुड्डा येथे बाल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In