मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रभू रामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त स्थानिक नारायण सेवा मित्र परिवारच्या वतीने श्री बालाजी मंदिरात दीपोस्तव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात दिव्यांची सजावट करण्यात आली. बालाजी मंदिराचे प्रांगणात प्रभू रामचंद्रांची आकर्षक प्रतिमा रांगोळी द्वारे साकारण्यात आली होती. तसेच मोहता चौक ते सुभाष चौक पर्यंत दिव्यांची भव्य सजावट करण्यात आली ही दिव्यांची सजावट शहरवासीयां साठी प्रमुख आकर्षण ठरले.
या उपक्रमात महंत सुरेशशरण शास्त्री महेश अग्रवाल, प्रा .किरण वैद्य, गौतम कोठारी, पराग मुड़े विपिन खींवसरा, निलेश भूतड़ा, रूपचंद हेमनानी, रामदास खडगी, सुंदर बसंतानी, गणेश जोशी, महेंद्र टावरी, राजू गुप्ता, चंदा कोठारी, वीरश्री मुड़े, अनुष्का मुड़े , अनुराधा मोटवानी, नेहा मोटवानी किरण अग्रवाल विधि चंदाराणा, रीमा चंदाराणा, शीतल तिवारी, शीतल भूतड़ा, रेखा जोशी, पदमा डालिया, प्राची डालिया, कृष्णा डालिया, राधा टावरी, खुशबू राठी, तेजस्विनी राठी आदिनी सहभाग घेतला.

