मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम जलोषत पार पाडले आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी भगवंतराव हायस्कूल इंदाराम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदाराम, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम असे तिन्ही शाळेचे विद्यार्थीनी रंगदार अशा बालगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतनवर नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकून सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले. असे सुंदर नृत्य पारिकतोषिक सुद्धा यावेळी देण्यात आले. याप्रसंगी विविध गाण्यावर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळांचे सर्व पालक वर्ग व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या अतिशय सुंदर कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी आनंद घातले.
यावेळी सरपंच वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, हनुमंत जि मडावी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त वनसंरक्षक आलापल्ली, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, शाकीर शेख ग्राम पंचायत सदस्य, शालीनी कांबळे ग्राम पंचायत सदस्य, रमेश आत्राम माजी ग्राम पंचायत सदस्य, किशोर तेलंगे सामजिक कार्यकर्त्या, स्वप्नील मडावी सामजिक कार्यकर्त्या, तेजू दुर्गे लेकपाल, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पेंदाम, नगरे सर, आरोग्य विभागचे कर्मचारी मडावी मॅडम, दुर्गे मॅडम, टी एच ओ कमसुरे मॅडम, भगवंतराव हायस्कूल इंदारामचें मुख्याधापक मम्मीडालवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक पुल्लुरवार सर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयचें मुख्याध्यापिका ढवस मॅडम, श्रीनिवास कोत्तावडालावार, राकेश अल्लुरवार, लक्ष्मण आत्राम सह गावकारी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

