अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मो. नं.९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३० जाने:- जवाहर कन्या विद्यालय सावनेर येथे स्नेहसंमेलन सोहळा दि. 24 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला.
यामध्ये विविध खेळ स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम आणि संत श्री.ताजुद्दीन बाबा जयंती उत्सवाचे औचित्य साधून बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयजी डाहाके, सचिव नरेंद्र डाहाके, उपाध्यक्ष मदन डाहाके, शिवसेना नेते उत्तम कापसे, सभासद विना बोबडे, यशपाल डाहाके, डॉ.राहुल डाहाके, स्वप्निल डाहाके, सौ.सोनाली जीवतोडे, जवाहर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा गोतमारे आणि पर्यवेक्षक राजू बांबल हे मान्यवर उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी स्वर्गीय दामोदरराव डाहाके यांचे पुतळ्याला माल्यार्पण केले आणि त्यांच्या कार्याची ओळख समाजात जागृत ठेवण्यासाठी विद्यार्थिनींनी शिक्षण क्षेत्रा बरोबर सांस्कृतिक आणि खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवून शाळेचे नाव लौकिक करणे गरजेचे आहे. असे उदगार संस्थेचे उपाध्यक्ष मदन डाहाके यांनी सोहळा दरम्यान म्हटले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

