Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

आता सिद्धिविनायकाचे दर्शन होणार अगदी सुलभ, मुंबई महानगर पालिकेचा विशेष प्रकल्प.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 31, 2024
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
आता सिद्धिविनायकाचे दर्शन होणार अगदी सुलभ, मुंबई महानगर पालिकेचा विशेष प्रकल्प.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महानगर पालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, पूजा साहित्य विक्रेत्यांचे गाडगीळ मार्गावर स्थलांतर प्रस्तावित आहे. दादर रेल्वे स्थानक पश्चिम ते सिद्धिविनायक मंदिरा दरम्यान दर 5 मिनिटांना ‘बेस्ट’तर्फे मिनी बस सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या दादर जी उत्तर व वरळी जी दक्षिण विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात मुंबईसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना अधिकाधिक सुलभरित्या दर्शन व्हावे, यासाठी पालिकेने विशेष प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष व आमदार सदा सरवणकर, पालिकेच्या वतीने उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात भाविकांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ता, रस्ते रुंदीकरण, मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार, अत्याधुनिक स्वच्छतागृह आदी सुविधांचा समोवश असेल.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेमार्फत ‘स्वारस्याची अभिव्यक्ती’ मागवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार/वास्तुशास्त्रज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार / वास्तुशास्त्रज्ञ यांनी दिलेल्या अहवालावर सदा सरवणकर आणि रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली जी उत्तर आणि जी दक्षिण या दोन्ही विभागांचे सहायक आयुक्त, पालिका वास्तुविशारद त्याचप्रमाणे प्रमुख अभियंता (विकास नियोजन), प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक), नगर उप अभियंता (इमारत बांधकाम शहर) या विभागांचे अधिकारी या प्रकल्पाचे कामकाज पाहणार आहेत.

मंदिराभोवती (रावबहादूर सी. के. बोले मार्गावर) असलेल्या पूजा साहित्य विक्रेत्यांमुळे प्रवेश द्वारा जवळ दररोज गर्दी होते. ती टाळण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांचे काकासाहेब गाडगीळ मार्गावर स्थलांतर करण्याचे प्रस्तावित आहे. दादर स्थानक ते मंदिरा दरम्यान दर ५ मिनिटांना ‘बेस्ट’ची बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शना साठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहे. मंदिराच्या दोन्ही मार्गांवर भव्य प्रवेशद्वार उभारणार आहे. अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करणार आहे. दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शन रांगेत तात्पुरती बसण्याची व्यवस्था असणार. ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता छत असणार. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करणार. भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था असणार.

Tags: प्रभादेवीमुंबईमुंबई महानगर पालिकासिद्धिविनायक मंदिर
Previous Post

धक्कादायक: सावनेर येथे भरगच्च वस्तीत असलेले एसबीआय बँकचे एटीएम फोडले, 15 मिनिटात 10 लाख चोरट्यांनी केले लंपास.

Next Post

आरोपीला मदत करण्यासाठी शरद पवार याने मागितली लाच, चक्क पोलीस स्टेशन मध्येच पोलीस अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आरोपीला मदत करण्यासाठी शरद पवार याने मागितली लाच, चक्क पोलीस स्टेशन मध्येच पोलीस अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या.

आरोपीला मदत करण्यासाठी शरद पवार याने मागितली लाच, चक्क पोलीस स्टेशन मध्येच पोलीस अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In