राजाराम (खां) पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन साखरे यांनी केले आव्हान.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जील्हातील अहेरी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या राजाराम (खांदला) पोलीस स्टेशन हद्दीतील झिमेला गावातील इसाम चंदू विस्तारी सडमेक वय 55 वर्षे रा. झिमेला पो. गुडडीगुडम ता. अहेरी जि. गडचिरोली यांनी राहत्या घरून रोजी दिनांक 9 फेब्रुवारीला बाहेर निघून गेले सायंकाळ पर्यन्त घरी परत आले नाही. त्यांची शोधाशोध घेतली असता ते मिळून आले नाही.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत पोलीस स्टेशन येथे मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत असून. सदर व्यक्ती कुठे आढळल्यास खालील नंबर वर किंवा पोलीस स्टेशन राजाराम खां येथे संपर्क करावे असे राजाराम पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन साखरे मो.न.7774844231यांनी केली आहे.

