मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षित धोरण आणि आप भी खाओ हम भी खाते हैं मिलजुलके असा धोरणामुळे वना नदी संवर्धन आणि बंधारा बांधकामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करून ही आज ते ताठ मानेने घुमत आहे.
हिंगणघाट शहरातून वाहणाऱ्या वना नदीच्या डंकीन ते शाहलंगडी ह्या भागात मोठ्याप्रमाणात नदीची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसरात्र नदी पात्रातून अविरत रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे सर्व दिवसाढवळ्या उघड्या डोळ्याने होत असताना प्रशासन, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, संवर्धन करणारे झोपी गेले आहे की स्वार्थ पाहून झोपेचे सोंग घेत आहेत असा प्रश्न जनतेच्या मनात तयार होत आहे.
त्यामुळे शेवटी लोक हतबल होत असताना आंदोलनकर्त्ये श्यामभाऊ इडपवार ह्यांनी स्वतः जाऊन डंकीन ते शाहलंगडी ह्या भागात पाहणी केली असता तिथे नदी मातेची खूपच दयनीय अवस्था झालेली आढळते. आता तिला नदी न म्हणता नाला असेच संबोधित करावे लागेल. मुख्यतः संपूर्ण हिंगणघाट शहराला डंकीन येथील जमिनीच्या आत खणलेल्या गुप्त विहिरीतूनच पाणी पुरवठा होतो. जर अश्या प्रकारे इथून अविरत रेतिउपसा होत राहिला तर येत्या उन्हाळ्यात हिंगणघाट शहरात पाण्याचा मोठा दुष्काळ होईल ही शक्यता नाकारता येणार नाही आणि कुठेतरी लखतरे तुटत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारी जनता सुधा ह्या नदीच्या दुरावस्थेस जबाबदार आहे; असा टोला श्याम इडपवार ह्यांनी लगावला त्याचबरोबर जर लगेच योग्य कार्यवाही न झाल्यास श्यमभाऊ स्वतः डंकीन ह्या परिसरातच जलसमधी आंदोलन करतील असा इशारा दिला.

