अनिल कडू, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लिपुरच्या कु.विद्या नरड हिने पटकावला जिल्हा परिषदेच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक. जल जिवन मिशन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महविद्यालय, तालुका व जिल्हा स्तरीय वरीष्ठ गटात स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
वरिष्ठ गटातुन हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथील कु. विद्या नरड हिने प्रथम पुरस्कार मिळविला असुन रोख 21 हजार रुपये व सन्मांचिन्ह देऊन उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, कार्यकारी अभियंता दीपक वाघ या मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.
वर्धेच्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृहात बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. विदया हिने आपल्या पुरस्कारांचे श्रेय आकाश कडुकर सर यांना दिले. प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल कु. विदयावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

