प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांचे आज सदर रेल्वे कवठा येथे ग्रामसभा स्थळी भेट देऊन गावातील समस्याच्या निवारीकरणासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्यासोबत चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी नागरिकाच्या मागणीनुसार वाचनालय येथे सुरू करण्यात यावे याकरिता जागेची पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या समस्या यासाठी सरपंच ग्रामसेवक यांनी मध्यस्थी काढून मार्ग काढला याकरिता रेल्वे कवठा ग्रामपंचायत निवेदन सुद्धा देण्यात आले ग्रामसेवकाकडून तसेच सरपंच उपसरपंच सदस्याकडून आश्वासन सुद्धा देण्यात आले लवकरात लवकर वाचनालयाचे रेल्वे कवठा येथे चालू करू आणि सहकार्य सुद्धा करू असे बोलताना त्यांनी सांगितले.
भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यावेळेस उपस्थित ग्रामसेवक वैशाली गायकवाड, सरपंच अंकुश मडावी, उपसरपंच दीपमाला नेहारे, सदस्य सुनीता राऊत, ताराबाई काळे, शुभांगी इंगळे, सुवर्ण मून, संदीप डोंगरे, गावातील मंडळी जिजा ताई सरोदे. राजमाला कोंडे .पुष्पा आचल बलवीर गीता थूल .ललिता गावंडे आरती मून अनिता वाणी. इत्यादी गण उपस्थित होते.

