रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील अंगलगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती जालना जिल्हा पूर्व कार्याध्यक्ष परमेश्र्वर खरात जिल्हा सचिव देविदास भाई कोळे जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा संघटक हनुमंत मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र भदर्गे तालुका महासचिव दिपक भाई वक्ते शहर अध्यक्ष राहुल नाटकर उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देऊन येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना निवडून देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. साहेबांचे विचार तळागळा पर्यंत पोहचविण्याचे काम करावे असे आपल्या भाषणातून सांगीतले.
उपस्थिती जिल्हा पूर्व कार्याध्यक्ष परमेश्र्वर खरात जिल्हा सचिव देविदास भाई कोळे जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा संघटक हनुमंत मोरे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे शहर अध्यक्ष राहुल नाटकर तालुका सदस्य बाळु झोटिंग गजानन उगले सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

