महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर जंगम यांच्या कडून निवळ जाहीर करण्यात आली.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी दिलीप मडावी यांची निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर जंगम यानी जाहीर केली आहे.
श्री.मडावी हे उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत झाले असून त्याना संघटनेच्या कामाचा दिर्घ अनुभव आहे आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी गडचिरोलीत मुख्यालयी रहातात. या जिल्ह्य़ातील ते पहिलेच आजीव सभासद आहेत. त्यांची या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
त्यानी जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्ष जाहीर करावेत यासाठी राज्य अध्यक्षानां विनवणी केली आहे. लवकरच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

