मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बामणी:- उप पोलीस स्टेशन बामणी येथे मोठया उत्साहात शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापिका टेंबरे यांना पोलीस प्रभारी अधिकारी मस्के यांच्या कडून सत्कार सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी उप पोलीस स्टेशन बामणी येथे 394 वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटात साजरी कऱण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्लासफोर्डपेठा येथील माजी मुख्याध्यापिका टेंबरे मॅडम यांचा शैक्षणिक कार्याबद्दल प्रभारी अधिकारी मस्के यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आले आहे. तसेच हद्दीतील साठ ते सत्तर महिलांना साडी चोळी, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर चेअर चे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत बीपी, शुगर, शिकलसेल ची मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्वांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सपोनि मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगडे सर (संत मनवदयाल विद्यालय बामणी) टेंबरे मॅडम, पोउपनी बंडे साहेब, पो
उपनि सपाटे साहेब, अजय आत्राम सरपंच वेंकटापुर, समय्या कुळमेथे, मनोज मंचेलवार व गावातील महिला नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पो अंम संतोष इंगळे यांनी केले आहे.

