Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरातील आदर्श मराठी प्राथमिक शाळेत चिंतन दिन निमित्त स्वच्छता प्रकल्प संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 22, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
राजुरातील आदर्श मराठी प्राथमिक शाळेत चिंतन दिन निमित्त स्वच्छता प्रकल्प संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्काऊट्स-गाईड्स विभागातर्फे लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती साजरी.

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 22 फेब्रु:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील स्काऊट्स – गाईड्स युनिटच्या वतीने या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून साजरा केला. यावेळी चंद्रपूर भारत स्काऊट्स – गाईड्स कार्यालया मार्फत केलेल्या मार्गदर्शक सूचने नुसार स्वच्छता प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्लास्टिक कचरा होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव येसेकर, सचिव बा.शी.प्र. मं., हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट मास्तर बादल बेले यांची उपस्थिती होती.

यावेळी भास्करराव येसेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड चळवळीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असतांनाच त्यांच्या अंगी देशप्रेम, स्वावलंबन, सेवाभाव, विश्वबंधुत्व, समानता या गुणांचा विकास होतो. मुख्याध्यापिका नलीनी पिंगे व बादल बेले यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. चिंतन दिनानिमित्त विश्वरत्न धोटे या विद्यार्थ्यांने लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या चरित्र व कार्याच्या माहितीचे वाचन केले. तसेच स्काऊट गाईडच्या विध्यार्थीनी स्वच्छता अभियान राबविण्यात सहकार्य केले.

यावेळी शिक्षिका ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती संभाजी महाराज स्काऊट युनिट लीडर रुपेश चिडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिजामाता गाईड युनिटच्या युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले.

Tags: आदर्श मराठी प्राथमिक शाळा राजुरालॉड बॅटन पॉवेलस्काऊट्स-गाईड्स विभागातर्फे लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती साजरी.स्वच्छता अभियान
Previous Post

50 एकर जमीन लाटल्याचा संजय राऊतांचा आरोप, विखे म्हणाले, कोर्टात दावा ठोकणार नाहीतर..!

Next Post

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत वर्धा शहरातील पान टपऱ्यांवर धडक कारवाई, 5 हजार 400 रुपये दंड वसूल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत वर्धा शहरातील पान टपऱ्यांवर धडक कारवाई, 5 हजार 400 रुपये दंड वसूल.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत वर्धा शहरातील पान टपऱ्यांवर धडक कारवाई, 5 हजार 400 रुपये दंड वसूल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In