निरंतर 17 वर्षा पासून रक्तदान शिबिरचे आयोजन होत आहे.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सुभाष चंद्र बोस जयंती एवं छत्रपति शिवाजी महाराज जयंती पर्व वर अभिनव विचार मंच हिंगनघाट, पतंजलि किसान सेवा समिति वर्धा तथा महिला पतंजलि योग समिति वर्धा द्वारे सिकल सेल एवं थैलेसीमिया रुग्णांसाठी हिंगणघाट पंचायत समिति सभागृह येथे रक्तदान शिविर चे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य रक्तदान शिविर मध्ये शहरातील अनेक नागरिकांनी नोदणीकरण केले होते. अभिनव विचार मंच निरंतर 17 वर्षा पासून उपक्रम करीत आहे. संस्था द्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्या कडून संकलित रक्त सिकलसेल आणि थैलेसीमियाने पीड़ित रुग्णांच्या सहायता करीता दिले जाते. या शिविर मध्ये 78 रक्तदाताने रक्तदान केले.

