मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे प्रेमातून एका तरुणाने खळबळजनक पाऊल उचलत आपल्या प्रेमिकांच्या विवाह दुसऱ्या तरुणाशी जुळल्यामुळे रागाचा भरात या तरुणाने वेडेपणाची हद्दपार करत प्रेमिकांच्या होणाऱ्या नवरदेवाच्याच घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.
प्रेमिकेचा साखरपुडा झाल्याचे समजताच एका माथेफिरु प्रियकराने नवरा मुलाचं घर गाठून घरासमोर जिवंत बॉम्ब ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आर्वी येथील विठ्ठल वॉर्डात राहाणाऱ्या नवरा मुलाच्या घरासमोर एका पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पिशवी ताब्यात घेऊन त्यातील वायर्स कापून बॉम्ब निकामी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणातील आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून नवऱ्या मुलीचा प्रियकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियकराने नैराश्येतून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्हातील आर्वी शहरात राहणाऱ्या वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराच्या गेटवर एक पिशवी दिसून आली होती. घराच्या बाहेर लावलेली ही पिशवी एका व्यक्तीने वंदना यांना आणून दिली. या पिशवीमध्ये टायमर आणि बॅटरी अशा अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच यामध्ये एक चिठ्ठी होती ज्यात लिहिले होते की “हात लावू नका अन्यथा स्फोट होईल.” या सर्व प्रकारामुळे वंदना चांगल्याच घाबरल्या. आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.
पुढे पोलिसांनी या पिशवीतील वस्तूंची तपासणी केली. त्यातून हे समोर आले की, पिशवीत स्फोट होईल अशा वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी सर्व घटनेची व्यवस्थित चौकशी केली. यातून हे समोर आले की, गेल्या काही दिवसां पूर्वीच वंदना यांच्या मुलाचा साखरपुडा झाला होता. ज्या मुलीशी या मुलाचा साखरपुडा झाला, तिच्याच प्रियकराने भीती दाखवण्यासाठी ही बॉम्बसदृश्य वस्तू त्यांच्या घराबाहेर ठेवली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे. तसेच या वस्तू त्याने कुठून मिळवल्या याचा ते तपास करीत आहेत.

