आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वर्धेच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कामगारांचे काम बंद आंदोलन करत उपोषणाला सुरवात केली आहे.
वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामगारांचा या आंदोलनात सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लाभलेली वसुलीची अट पूर्तता रद्द करा व ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करा; या मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवार पासून या आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून २९ फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन चालणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले. कामबंद आंदोलना मुळे ग्रामपंचायतीमधील चालणारे गावगाड्याच्या काम ठप्प झाली आहेत.

