अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी त्याच्या विशेष प्रयत्नातून विधानसभा श्रेत्रातील गावातील रस्त्यासाठी अर्थसंकल्पीय निधी मंजूर करून घेतला असून या निधीच्या कामांचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन ०३ मार्चला करण्यात आले होते.
यावेळी आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते सिरसगाव आजनसरा, हिवरा, बोपापुर, पोहणा, वेणी, शेकापुर, गांगापूर, बार्मडा, दोंदुडा, पोहणा ते वेणी रस्त्याचे ०३ कोटी ५० लक्ष रुपये किंमतीच्या खापरी, पिपरी जांगोणा, वेणी, सास्ती, हडस्ती, धोची, सेलू, सास्ती, बोपापुर ते डोमाघाट रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, बोपापुर रस्त्याचे दुरुस्तीच्या काम आदीचे भुमिपुजन आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती माधवराव चंदनखेडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ विजय पर्बत, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद विटाळे आदिंसह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी मोठ्या उपस्थित होते.

