हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि 04 मार्च:- ज्या नगर पालिका प्रशासनाने शहरातील जनतेच्या प्रश्न सोडवून त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण नगर पालिका प्रशासनाने मनमानी करत पाणी बिलात भरमसाठ वाढ केली. अगोदरच महागाई मुळे जनता त्रस्त आहे त्यात या भरमसाठ अवाढव्य पाणी बिला गरीब आणि सर्वसाधारण जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे.
बल्लारपूर शहरातील जनता पाण्याच्या अवाढव्य बील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे खुपच त्रस्त आहे. असे असताना आम आदमी पक्षातर्फे आज शहरातील सरकारी दवाखान्या समोर नगरपरिषद चौकात आम आदमी पक्षातर्फे धरना आंदोलन करण्यात आले. व या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील समस्याग्रस्त नागरिक तसेच पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन जनतेने आक्रोश व्यक्त केला व अवाढव्य नळ बिलाचे दहन करण्यात आले. यासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी पाणी बिलांच्या संदर्भातील समस्या लवकर निकाली लावा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कार्यपद्धती सुधारा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यां कडून काम करवून घेणे बंद करा, त्याऐवजी शिक्षित युवकांना रोजगार द्या असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्या अध्यक्षतेत एक मागणीपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. ज्याचा उत्तर तीन दिवसात मिळाले नाही तर पक्षातर्फे साखळी उपोषण केले जाईल. अशा इशारा यावेळी आम आदमी पक्षा तर्फे देण्यात आला

