Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

फुले शाहू आंबेडकराच्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध, शेकडो आंबेडकर वाद्यानी गाव सोडले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 7, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
फुले शाहू आंबेडकराच्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध, शेकडो आंबेडकर वाद्यानी गाव सोडले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती: जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या स्वागत प्रवेशद्वार काही नागरिकांन नाहक विरोध करण्यात येत असल्याने आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव स्वागत प्रवेशद्वाराला देण्याची मागणी गावातीलआंबेडकरी बौद्ध बांधवांनी केली होती. तसा ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतला होता. परंतु याला काही इतर समाजबांधवांनी विरोध दर्शविल्याने गावामध्ये दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी गाव सोडले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, मंगळवारी रात्रीपासूनच गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 2020 रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारुन त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता. परंतु याच कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे 26 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन या प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असाही ठराव पारीत करण्यात आला होता. तसेच खानमपूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम करणे करिता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग अकोला यांच्याकडूनही 22 फेब्रुवारी 2024 ला प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त देण्यात आले होते. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर मात्र गावातील काही समाजबांधवांकडून या प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला.

तसेच गावातील बौद्ध बांधवावर बहिष्कार टाकल्याची तक्रारही देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे गावातील दिडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी बुधवारी गाव सोडून मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारामुळे सामाजिक सलोखा कायम रहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावामध्ये 8 मार्च पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलिसांचा गावामध्ये बंदोबस्त दिसून येत आहे. गाव सोडलेले शेकडो बांधव हे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर मार्गे अमरावतीमध्ये येऊन जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत, त्यानंतर येथून सर्व मुंबई मत्रालयाच्या दिशेने पुढील प्रवास सुरु करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Tags: अंजनगाव सूर्जी तालुकाअमरावती जिल्हाअमरावती जिल्हाधिकारीआंबेडकरी समुदायाचे आंदोलन
Previous Post

बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 81 व्या सालाना वर्षीक ऊर्स दरम्यान कुल कार्यक्रम संपन्न, सिने अभिनेता राज बब्बर यांची वाकी दरबारला भेट.

Next Post

परतूरच्या त्या दोन चार पत्रकराला निवेदन देण्याचे कोणी सांगितले यांची चौकशी करा राहुल नाटकर शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
परतूरच्या त्या दोन चार पत्रकराला निवेदन देण्याचे कोणी सांगितले यांची चौकशी करा राहुल नाटकर शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

परतूरच्या त्या दोन चार पत्रकराला निवेदन देण्याचे कोणी सांगितले यांची चौकशी करा राहुल नाटकर शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In